खालीलप्रमाणे श्री स्वामी समर्थ सेवा संस्थान ट्रस्ट, अक्कलकोट यांच्या मागील तीन वर्षाचे अहवाल.
आर्थिक वर्षे 2022–23, 2023–24 व 2024–25 या कालावधीत श्री स्वामी समर्थ सेवा संस्थान ट्रस्ट, अक्कलकोट यांनी आपल्या उद्दिष्टांनुसार धार्मिक,
सामाजिक व सेवाभावी स्वरूपाची विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले. या कालावधीत संस्थेमार्फत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची नियमित देखभाल, निवास,
अन्नदान, वस्त्रदान तसेच आवश्यक आरोग्य सेवा व औषधोपचारांची व्यवस्था करण्यात आली. गोसेवा उपक्रमांतर्गत गोमातांची दैनंदिन निगा, चारा-पाणी, स्वच्छता
व वैद्यकीय उपचार यांची नियमित अंमलबजावणी करण्यात आली. स्वामी समर्थ जयंती, धार्मिक उत्सव, पूजा, अभिषेक, आरती व भंडारा यांसारखे धार्मिक कार्यक्रम
श्रद्धा व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आले. संस्थेच्या कार्यकारिणी व विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपक्रम नियोजनबद्धरीत्या राबविण्यात आले
असून, प्राप्त देणग्या व निधीचा उपयोग केवळ संस्थेच्या उद्दिष्टांनुसार व नियमबद्ध पद्धतीने करण्यात आला. संस्थेचे उत्पन्न‑खर्च खाते, ताळेबंद व संबंधित
लेखापरीक्षण (Audit) वेळोवेळी अधिकृत लेखापरीक्षकांमार्फत तपासण्यात आले असून, त्यासंबंधीचे अहवाल व नोंदी नियमानुसार जतन करण्यात आले
आहेत. सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयास आवश्यक ते सर्व अहवाल, विवरणपत्रे व कागदपत्रे वेळेत सादर करण्यात आली असून, संस्था भविष्यातही
पारदर्शक, नियमबद्ध व सेवाभावी कार्य करण्यास कटिबद्ध आहे.
खालील दिलेली सर्व माहिती संस्थेमार्फत चालवण्यात येणारे उपक्रम किंवा भविष्यात करावयाचे उपक्रम दर्शवत आहे, आपण खालील माहिती वर क्लिक करून संबंधित उपक्रमाची माहिती पाहू शकता व उपक्रमासाठी आर्थिक पुण्यदान देऊ शकतात